1starnews.com

उजनी धरणातून 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, चंद्रभागेत पाण्याचा प्रवाह वाढणार, पंढरपूरमध्ये सतर्कतेच्या सूचना

उजनी धरणातून 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

उजनी धरणातून 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

उजनी धरणातून 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातील पाण्याची पातळी 96.70% वर पोहोचली होती.

उजनी धरणातून 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे उजनी धरण भरले आहे. गेल्या काही तासांमध्ये उजनी धरणातून भीमा नदीत सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंढरपूरसह भीमा नदीच्या (Bhima River) काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून (Ujani Dam) भीमा नदीत 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. उजनी धरणात सध्या येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 1 लाख 60 हजार क्युसेक इतका आहे. त्यामुळे उजनी धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून काल रात्री 12 वाजेपर्यंत 60 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची पातळी 96.70% वर पोहोचली होती. उजनी धरणातून

उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 80 हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने पंढरपूरचा पुराचा धोका वाढला आहे. आज दुपारी चंद्रभागा पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्याप्रमाणावर वाढेल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पंढरपूरमध्ये

(Pandharpur) प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीर धरणाचा विसर्ग 32459 क्युसेख इतका कमी झाला असला तरी उजनी व वीर धरणाचा एकत्रित विसर्ग चंद्रभागेत

(Chandrabhaga River) साधारण सव्वा लाख ते दीड लाख इतका असेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन चंद्रभागा काठावरील अंबाबाई पटांगण व व्यासा नारायण वसाहतीतील 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.जायकवाडी धरणात पुढील आठ महिने पुरेल इतका पाणीसाठाजायकवाडी धरणात 24 हजार 697 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणात 13.10 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आज दुपारनंतर जायकवाडीतील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा पाणीसाठी पुढील आठ महिने पुरु शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

हे हि पाहा>बांगलादेश हिंसाचारात ९१ जणांचा मृत्यू, केंद्राचा भारतीयांना इशारा; हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला

Exit mobile version