1starnews.com

भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक

भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक

Olympics 2024 day 6 India in Medal Race : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी (१ ऑगस्ट) भारताला तीन पदकांची आशा आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकाराची आज अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असून आज दुपारी १ वाजता त्याच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. स्वप्नीलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तसेच याच खेळाच्या महिलांच्या श्रेणीत शिफ्ट कौर समारा आणि अंजुम मौदगिल या भारताच्या दोन नेमबाज आज पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. तर भारताची स्टार बॉक्सर निखत झरीन ५० किलो वजनी गटात उप-उपांत्य फेरीत खेळणार आहे

आज भारताला तीन पदकांची आशा

स्वप्नील कुसळेची अंतिम फेरीत धडक

स्वप्निल कुसळे याने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात पात्रता फेरीत सातवं स्थान पटकावत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. स्वप्निलने एकूण ५९० गुणांची कमाई केली. स्पर्धा प्रकारातील पहिल्या गुडघे टेकण्याच्या स्थितीतून स्वप्निलने १९८ (९९,९९) गुणांची कमाई केली. त्यानंतर प्रोन पद्धतीत १९७ (९८, ९९) आणि उभे राहून १९५ (९८, ९७) गुणांची कमाई केली.

हे ही वाचा >> Lakshya Sen : ‘करो या मरो’च्या लढतीत लक्ष्य सेनच्या भन्नाट शॉटने चाहते अवाक्, VIDEO होतोय व्हायरल

भारतीय हॉकी संघासमोर बेल्जियमचे आव्हान

उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघासमोर पॅरिस ऑलिम्पिकच्या ‘ब’ गटात गुरुवारी गतविजेत्या बेल्जियमचं आव्हान असणार आहे. यावेळी भारताला आपल्या कामगिरीमधील सातत्य राखणं गरजेचं आहे. भारताने बेल्जिमयचा पराभव केल्यास भारतीय हॉकी संघ पदकाच्या दिशेने एक पाऊल टाकेल.

Exit mobile version