लोणावळ्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या २४ तासांत २३२ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे.

पुणे : लोणावळ्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या २४ तासांत २३२ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. अद्यापही पाऊस कोसळत असून गेल्या वर्षी कोसळलेल्या पावसाचा रेकॉर्ड यावर्षी तुटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एकूण ४,५१८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाळा सुरू झाल्यावर ऑगस्ट पहिल्या आठवड्यापर्यंत ४,०४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग

लोणावळ्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. . गेल्या २४ तासांत २३२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. http://लोणावळ्यात पर्यटकांची आणखी गर्दी वाढत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर शहरांतून हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक कोसळत असल्याने पर्यटकांमध्ये आणि व्यापारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोणावळ्यात यावर्षी आत्तापर्यंत ४,०४७ मिलिमीटर पाऊस कोसळला असून गेल्यावर्षीचा रेकॉर्ड तुटणार यात दुमत नाही.

हेही वाचा >मनु भाकर की शूटिंग करियर