वॉरेन बफे सोमवारी शेअर बाजारात इतकी मोठी घसरण झाली की याची कल्पनाही कोणी केली नव्हती. गुंतवणूकदारांना असा धक्का बसला की 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3-3 टक्क्यांची घसरण झाली.शेअर बाजारातील तज्ज्ञांना ही घसरण अपेक्षित होती का? उच्च स्तरावरून बाजारात घसरण होऊ शकेल असे काही तज्ज्ञांना वाटत होते, पण बाजार किती वेगाने आणि किती खाली जाईल हे कोणालाच माहीत नव्हते, पण वॉरेन बफे इंडिकेटरने ओळखले होते की बाजारात एक बबल तयार होत आहे.बफेट्स इंडिकेटर भारताचे बाजार भांडवल GDP मध्ये मोजतो. या निर्देशांकाने दाखवून दिले की अर्थव्यवस्थेतील इक्विटी बाजारात बबल तयार होत आहे. भौगोलिक-राजकीय तणाव, निराशाजनक आर्थिक आकडेवारी आणि जपानी येन कॅरी ट्रेड संपुष्टात आणल्यानंतर यूएसमध्ये मंदीची भीती यामुळे जागतिक स्तरावर बाजाराचा मूड खराब झाला आणि त्यामुळे भारतीय बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.
1शेअर बाजारातील घसरणीची वॉरेन बफे
प्रमुख कारणे2 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील रोजगार वाढीचााछ अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकन बाजारात मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत जुलै महिन्यात नोकरीची वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे.बँक ऑफ जपानने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आणि रोखे खरेदी कमी केली, त्यामुळे अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे.5 ऑगस्टला शेअर बाजारात घसरण होण्यामागे भौगोलिक-राजकीय तणाव हेही महत्त्वाचे कारण मानले जात आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा बाजारातील भावनांवर परिणाम झाला आहे.
शेअर बाजारात पुढे काय होणार?वॉरेन बफे
गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध राहिले पाहिजे. कारण येणाऱ्या काळात जागतिक पटलावर आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर बाजारासाठी येणाऱ्या काळात महत्त्वाच्या ट्रिगर्सवर लक्ष ठेवावे लागेल.
जसे की भारतीय रिझर्व्ह बँकेची चलन विषयक धोरण समितीची बैठक. या बैठकीत काय निर्णय होईल याचा परिणाम शेअर बाजारावर दिसणार आहे.
हे ही पाहा> Share Market: शेअर बाजारात होणार मोठा बदल; सेबी घेणार AIची मदत, गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?
हेही पाहा>