मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे शनिवारी होणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते उद्या (दि. १७) रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याला जोडणाऱ्या महामार्गावरील सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित असणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम उद्या पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. 

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट असल्याचं सांगण्यात आलं होतं. महिला आणि बालविकासमंत्री  आदिती तटकरे यांनी  या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नाही. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील, अशी माहिती आहे. 

महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात 

महाराष्टसरकारनं राज्यातील ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्य सरकारनं रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवण्यास सुरुवात करण्यात आले आहेत. राज्य सरकारची ही महत्त्वकांक्षी योजना असून रवी राणा आणि महेश शिंदे या दोन आमदारांनी याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.  

Ladki Bahin

हेही पाहा > Vinesh Phogat: विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार? कुस्तीच्या नियमातील ‘ही’ त्रुटी विनेशच्या प्रकरणाला देणार वळण