Kangana Ranaut Interview On Farmers Protest: शेतकरी आंदोलनातही बांगलादेश आंदोलनासारखे मोठे नियोजन होते. यामागे चीन आणि अमेरिका सारख्या परकीय शक्ती कार्यरत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडीची भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आता तिने पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनासंदर्भात वक्तव्य केलं आहे. कंगनाने म्हणाली की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि हत्या झाल्या.
बांगलादेशातील आंदोलक आणि शेतकऱ्यांची तुलना करताना कंगना म्हणाली की, केंद्राने कृषी कायदे मागे घेतले हे चांगले झाले अन्यथा पंजाबची अवस्था बांगलादेशसारखी झाली असती. आता कंगनाच्या या विधानाने चांगलाच खळबळ उडाली आहे. कंगनावर एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली जात आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने ही आक्षेपार्ह विधाने केली आहेत.
“बलात्कारआणि हत्या…”
कंगना राणौतने एका मुलाखतीत सांगितले की, “शेतकरी आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये बलात्कार आणि हत्यांचाही समावेश होता. केंद्र सरकारने शेतीविषयक विधेयके मागे घेतली नाहीतर आंदोलकांचे मोठे नियोजन होते आणि ते देशात काहीही करू शकले असते.”
शेतकरी आंदोलनामागे देश अस्थिर करू पाहणाऱ्या काही लोकांचे मोठे षडयंत्र असल्याचेही कंगना राणौत म्हणाली. ती म्हणाले की, आंदोलकांनी देशाविरुद्ध विष पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
आपले नेतृत्त्व…
केंद्र सरकारचे कौतुक करताना कंगना राणौत म्हणाली “आपले नेतृत्व (पंतप्रधान) मजबूत नसते तर या लोकांनी पंजाबचे बांगलादेशात रूपांतर केले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालले होते ते देशापासून लपलेले नाही. आंदोलनादरम्यान माणसे मारली जात होती, मृतदेह लटकवले जात होते. सरकारने हे विधेयक मागे घेताच या साऱ्यांना मोठा धक्का बसला.”
काँग्रेसने फटकारले
कंगनाच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत लिहिले, “भाजप खासदार कंगनाजी यांचे नवे विधान असे आहे की, शेतकरी आंदोलनातही बांगलादेश आंदोलनासारखे मोठे नियोजन होते. यामागे चीन आणि अमेरिका सारख्या परकीय शक्ती कार्यरत आहेत. हे कंगनाजींचे वैयक्तिक मत आहे की भाजप आणि सरकारचे मत आहे?
सुप्रिया श्रीनेट पुढे म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना खूप शिव्या दिल्या, आता त्यांचे खासदारही शेतकऱ्यांना मारेकरी आणि बलात्कारी म्हणत आहेत. याचे उत्तर आम्ही देणार नाही, अवघ्या काही दिवसांत हरियाणा उत्तर देईल. मात्र राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले गेले असतील तर भाजप आणि सरकारला उत्तर द्यावे लागेल. तसे नसेल तर या खासदाराने कान धरून माफी मागावी.
हेही पाहा>Balaji burange: एका गरीब घरातून नॅशनल चॅम्पियन आणि आंतरराष्ट्रीय कोच होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास