1starnews.com

Badlapur Sexual Assault Case: “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले

Badlapur Sexual Assault Case

Badlapur Sexual Assault Case

Badlapur Sexual Assault Case Devendra Fadnavis Reaction : गेल्या आठवड्यात बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेच्या तीन दिवसांनी चिमुरड्या मुलींनी पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर पालकांनी शाळेत व पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाली. तर शाळेनेही पालकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. परिणामी आज (२० ऑगस्ट) बदलापूरकर रस्त्यावर उतरले. त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. तसेच त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं असून शाळेत तोडफोड केली व बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रोखल्या. या घटनेवर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, या शाळेच्या संचालक मंडळावरील प्रमुख अधिकारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली असल्याचं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंचा आरोप काय?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारने अशा प्रकरणांमधील गुन्हेगारांना आणि अशी घाणेरडी विचारधारा असणाऱ्या लोकांना ‘शक्ती’ कायद्याची शक्ती दाखवून दिली पाहिजे. मला नुकतंच असं समजलं आहे की ती शाळा भाजपाशी संबंधित लोकांची आहे. शाळेच्या संचालक मंडळावर भाजपाचे कोणीतरी आहेत. मी हे सांगून राजकारण करत नाहीये. इतरांनीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. उलट सर्वांनी सर्व प्रकारचे भेद विसरून एकत्र यायला हवं. तसेच आरोपीवर तातडीने कारवाई केली पाहिजे”.

दरम्यान, आरोपी भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे दावे देखील काही पालक करत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तो आरोपी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तो भाजपाचा कार्यकर्ता असला तरी कारवाईत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये

उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण करणं त्यांना शोभत नाही. ही खूप संवेदनशील घटना आहे. अशा प्रसंगी उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या राजकीय नेत्यांनी राजकीय वक्तव्ये न करता, राजकारण न करता एखाद्या उत्तम राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे, तसेच जनतेला कसा न्याय देता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी असं वागून चालत नाही. उलट त्यांनी उचित सूचना करायला हव्यात.

Badlapur Sexual Assault Case

हेही पाहा>New Mahindra Thar: एक क्लासिक एसयूवी का मॉडर्न अवतार

Exit mobile version