Bhoom Dist Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना शनिवारी घडली. या (Bhoom) प्रकरणातील पाचपैकी चार आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. दरम्यान पीडितेला धाराशिव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून भूममध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, घटना समजताच भूम पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी जाऊन पीडितेला प्राथमिक चिकित्सालयात उपचारार्थ नेले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तात्काळ चिकित्सालयातून धाराशिवच्या शासकीय हॉस्पिटलला रेफर केले आहे. पीडितेने प्राथमिक चौकशीत पाच आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. यादरम्यान डीवायएसपी आले आणि शोध सुरू केला. पाच आरोपी पैकी चार आरोपींना पकडण्यात आले आहे. (Bhum Gang rape) पीडितेचा सविस्तर जबाब चालू आहे. जबाब झाल्यानंतर घटनेबाबत तपशीलवार माहिती हाती येईल, असे अति. पोलीस अधीक्षक गोहर हसन यांनी सांगितले
हेही पाहा >Kangana Ranaut Interview: “शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार अन् हत्या,” कंगनाचा व्हिडिओ व्हायरल