1starnews.com

Vinesh Phogat Reaction on Overweight: विनेश फोगटने अखेर मौन सोडलं, वजन वाढण्याबाबत निर्णयापूर्वी केलं मोठं विधान

Vinesh Phogat Reaction on Overweight

Vinesh Phogat Reaction on Overweight

Vinesh Phogat Reaction on Overweight: विनेश फोगटने आतापर्यंत आपलं वजन का वाढलं, याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. पण आता विनेशने यावर आपले मौन सोडले आहे. विनेश वाढलेल्या वजनाबद्दल काय म्हणाली, जाणून घ्या…

  1. विनेश फोगटने आतापर्यंत वजन कसं वाढलं, हे सांगितलेलं नव्हतं.
  2. विनेशने आता आपल्या वजनाबाबत मौन सोडले आहे.
  3. रौप्यपदकाचा निकालाआधी विनेश काय म्हणाली, जाणून घ्या…महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पॅरिस : विनेश फोगटने आतापर्यंत आपले वजन का वाढले, हे स्वत:हून सांगितले नव्हते. पण जेव्हा तिने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली त्यावेळी तिला वनज का वाढले, बाबतचे कारण सांगावे लागले. त्यानंतर विनेशने या वजन वाढीबद्दल अखेर मौन सोडले असून तिने याबाबत नेमकं काय घडलं ते मांडले आहे.

विनेशने क्रीडा लवादापुढे वकीलांच्या माध्यमातून सांगितले की, ” स्पर्धांमधील व्यस्त वेळापत्रकामुळे मला वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवसानंतर ५२.७ किलोचा टप्पा मी गाठला होता. मला कोणताही स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही. कारण माझे दुसऱ्या दिवशी सकाळी अतिरिक्त १०० ग्रॅम वजन होते, ही गोष्ट ऑलिम्पिकमध्ये आल्यावरच घडली आणि का घडली, हेदेखील स्पष्ट आहे. पहिल्या दिवशी तीन लढती झाल्या आणि त्याचा परीणाम माझ्या शरीरावर झाला, हेच खरं कारणं वजन वाढण्याचे आहे.”

विनेशने ही गोष्ट सांगितल्यावर तिच्या वकीलांनी सांगितले की, ” १०० ग्रॅम हे वजन नगण्य आहे (जे खेळाडूंच्या वजनाच्या ०.१ ते ०.२ टक्के आहे) आणि उन्हाळ्याच्या हंगामात मानवी शरीरावर काही बदल होत असतात. कारण उष्णतेमुळे मानवी शरीराला जगण्याच्या उद्देशाने जास्त पाणी सेवन करावे लागले. हे स्नायूंच्या वाढीमुळे देखील असू शकते. कारण खेळाडूने एकाच दिवसात तीन वेळा स्पर्धा केली आहे, त्यामुळे तिच्या शरीरात नक्कीच बदल होतो. खेळाडू खेळत असताना त्यांचा डाएट वेगळा असतो. त्याचबरोबर वातावरण कसे आहे, याचादेखील त्यांच्या शरीरावर परीणाम होत असतो. त्यामुळे विनेशने कोणताही धोका दिलेला नाही किंवा कोणतेही गैरवर्तन केलेले नाही

विनेश फोगटचे वजन हे फायनलपूर्वी १०० ग्रॅमने जास्त होते, त्यामुळे तुला फायनल खेळता आले नाही. त्यामुळे तिला सुवर्णपदकाला मुकावे लागले. पण अंतिम फेरीत पोहोचल्यावर मला किमान रौप्यपदक तरी देण्यात यावे, अशी मागणी विनेशने केली आहे. त्यामुळे आता या विनेशच्या याचिकेवर काय निकाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

विनेशने क्रीडा लवादापुढे जी याचिका दाखल केली आहे, त्यामध्ये तिने संयुक्तपणे आपल्याला रौप्यपदक द्यावे अशी मागणी केली आहे. या याचिकेचा निकाल हा मंगळवारी येणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मंगळवारी नेमकं काय होतं, याची उत्सुकता तमाम क्रीडा विश्वाला असणार आहे.

http://Vinesh Phogat Reaction on Overweight

हेही पाहा>Dapolit Share Market :दापोलीत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल ; एकाला बंगळूर येथून अटक

Exit mobile version