Vinesh Phogat :विनेश फोगटनं कमाल केली, पाऊण तासात दोन पैलवान चितपट,भारताची पैलवान विनेश फोगटनं 50 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आज रात्री सायंकाळी साडे नऊ वाजता उपांत्य फेरीची लढत होईल.
Vinesh Phogat :पॅरिस :भारताची पैलवान
पॅरिस : भारताची पैलवान विनेश फोगटनं (Vinesh Phogat) 50 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटची लढत यूक्रेनच्या ओकसाना लिवाच हिच्याशी होती. विनेश फोगटनं अखेरच्या मिनिटात आक्रमक खेळ करत 7-5 अशा फरकानं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा 7-5 पराभव करत विनेश फोगटनं उपांत्य फेरीत प्रवेश केली. उपांत्यपूर्व फेरीत भारताची पैलवान विनेश फोगट हिनं 50 किलो ग्राम वजनी गटात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या युई सुसाकीला पराभूत केलं होतं. विनेश फोगटनं टेक्निकल पॉईंटच्या आधारे विजय मिळवला. उपांत्य पूर्व फेरीत विनेश फोगटनं ओकासाना लिवाच हिचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे
उपांत्य फेरीची लढत आज रात्री
विनेश फोगटचं उपांत्य फेरीची लढत आज रात्री साडे नऊ वाजता होणार आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे. गुझमन हिनं उपांत्यपूर्व फेरीत तिची प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूचा 10-0 असा पराभव केला.
हेही पाहा > Avinash Sable अविनाश साबळे: एकेकाळी बीडमध्ये गवंडी, आता गोल्डन स्टीपलचेसर
hehi Paha > Share Market: शेअर बाजारात होणार मोठा बदल; सेबी घेणार AIची मदत, गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?