Vinesh Phogat Disqualification Case:

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा कोर्टात याचिका दाखल केली, ज्याचा निर्णय आज १३ ऑगस्टला येणे अपेक्षित आहे, पण त्यादरम्यान UWW चा एक नियम समोर आला आहे.

Vinesh Phogat Disqualification Case Verdict Updates: कुस्तीपटू विनेश फोगटसह संपूर्ण देश पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) मधील अपात्रतेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने (CAS) सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मंगळवारी १३ ऑगस्टला याबाबत निर्णय देऊ असे सांगितले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ६ ऑगस्टला जपानच्या युई सुसाकीविरुद्धच्या विजयासह विनेशने सलग तीन विजय मिळवत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेशला सुवर्णपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँडविरुद्ध सामना खेळायचा होता. पण या विजेतेपदाच्या लढतीतून विनेशला अतिरिक्त वजनामुळे बाहेर पडावे लागले. सकाळी तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.

विनेश फोगटने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर गेल्या बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये (CAS) या निर्णयाविरुद्ध अपील केले आणि तिला क्युबाच्या कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझसोबत संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली. लोपेझला उपांत्य फेरीत विनेशकडून पराभव पत्करावा लागला होता पण नंतर भारतीय कुस्तीपटू अपात्र ठरल्यानंतर तिला अंतिम फेरीत स्थान मिळाले.विनेश फोगटच्या या प्रकरणाबाबत, नियमाला धरूनच विनेशला अंतिम फेरीतून अपात्र ठरवले असल्याची बरीच चर्चा आहे, परंतु युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमांमध्ये एक त्रुटी दिसून आली आहे. Revsportz च्या अहवालानुसार, कुस्ती मंडळाने असे सुचवले आहे की विनेश १०० ग्रॅमच्या फरकाने सामना खेळण्यासाठी अपात्र ठरली, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

UWW च्या नियमातील त्रुटीUWW

(युनायटेड वर्ल्ड रेसलिंग) च्या नियमांनुसार, अंतिम फेरीत पराभूत झालेला कुस्तीपटूच रिपेचेजचा दावा करू शकतो. ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये जपानच्या युई सुसाकीला रिपेचेज फेरीत कांस्यपदकासाठी झुंज देण्याची संधी देण्यात आली. परंतु, नियमानुसार, विनेश अंतिम फेरीत पोहोचली नाही कारण अतिरिक्त वजनामुळे तिला सुवर्णपदकाच्या सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले.विनेशला अपात्र ठरवल्यानंतर अंतिम सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन आणि यूएसएच्या सारा हिल्डब्रँड यांच्यात झाला. हा अंतिम सामना सारा हिल्डब्रँडने जिंकला. मग सुसाकीला रिपेचेजमध्ये कोणत्या आधारावर भाग घेऊ दिला? नियमांचे पालन करण्याचा मुद्दा आहे तर सुसाकीला रिपेचेज खेळण्याची परवानगी द्यायला नको होती, पण UWW ने तसे होऊ दिले आहे. विनेशने राउंड ऑफ१६ च्या सामन्यात युई सुसाकीचा पराभव केला होता.


जर विनेशचा अंतिम फेरीत समावेश केला नाही तर निश्चितपणे सुसाकी देखील रिपेचेज सामन्याचा भाग नसावी, असे या नियमावरून म्हटले जात आहे. UWW च्या नियमांमध्ये त्रुटी असल्याचे दिसत असले तरी, विनेशचे वकिल यावरून कोर्टात कसा युक्तिवाद करतात यावर सर्व काही अवलंबून आहे. आज विनेश फोगट प्रकरणावर निकाल देण्यापूर्वी सीएएसची अंतिम सुनावणी होणार आहे.

Vinesh Phogat: विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार? कुस्तीच्या नियमातील ‘ही’ त्रुटी विनेशच्या प्रकरणाला देणार वळण

Vinesh Phogat :केस सुनवाई ओलंपिक रोप्य पदक अंतिम फैसला आज रात 9:30 बजे आएगा

http://Vinesh Phogat Olympic 2024